राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, पोलिसांना कडक कारवाईचे दिले आदेश – मुख्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Udhav-Thakare-5.jpg)
मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल (मंगळवारी) संध्याकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. या तोडफोडीत घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी, अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे.
दरम्यान राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन संताप व्यक्त केला आहे.