breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न करतोय – निलेश राणे
मुंबई – अन्वय नाईक प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. या प्रकरणात ठाकरे कुंटुबियांकडून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट करून हा आरोप केला आहे.
“अन्वय नाईक यांच्याबद्दल माहिती काढत असताना त्यांनी एक प्रॉपर्टी ठाकरे कुटुंबाला विकली आहे. आजही प्रॉपर्टी कार्डवर त्याची नोंद आहे. युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करायचा प्रयत्न करतोय, त्याला माहित नाही हे प्रकरण कधी ठाकरेंच्या अंगाशी येईल कळणार नाही”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.