breaking-newsमुंबई

म्हाडा घरांच्या किमती १० टक्के कमी?

  • ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या १,३८४ घरांसाठी १६ डिसेंबरला सोडत जारी होणार असून उच्च उत्पन्न गट वगळता अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या जाहिरातीत दिलेल्या किमतीत १० टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहेत. ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीतील अत्यल्प गटातील घरांच्या किमती १४ ते २० लाख तर अल्प गटातील घरांच्या किमती या २० ते ३५ लाखांपर्यंत आहेत. मध्यम गटातील घरांच्या किमती ३५ ते ६० लाख आहेत. म्हाडाच्या नव्या धोरणानुसार घरांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी केल्यानंतरही अल्प, अत्यल्प व मध्यम गटांच्या घरांच्या किमती जास्त असल्याचा सूर होता.

त्यामुळे या किमती दहा टक्क्यांनी कमी करण्याबाबत चव्हाण यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत किमतीसंदर्भात अभ्यास करून आता म्हाडाच्या घरांच्या किमती आणखी कमी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय ११ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील ज्या अर्जदारांना सोडतीत म्हाडाचे घर लागेल त्यांच्याकडून लॉटरीत जाहीर झालेल्या आताच्या किमतीपेक्षा १० टक्के रक्कम कमी वसूल करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी  मुंबई गृहनिर्माण मंडळाचे सभापती चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button