…म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ
मुंबई | महाईन्यूज
छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय तारखेनुसार जयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते मात्र शिवसेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. त्यामुळे यंदा राज्यातील सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणारी शिवसेना तारखेनुसार की तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीचा हट्ट सोडा अन् १९ फेब्रुवारीला शिवजयंती जाहीर करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेलं आहे.
राष्ट्रवादीच्या या आवाहनानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे, एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मिटवून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे.