breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

….म्हणून राम वर्गणी त्यांच्या डोळ्यात खुपते – आशिष शेलार

संजय राऊत यांच्यावर टीका

मुंबई | प्रतिनिधी

“आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा. शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका राम मंदिर विरोधी आहे, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेनेनं राम मंदिरासाठी घेण्यात येणाऱ्या वर्गणीवरुन भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार म्हणाले की, “भाजपसाठी हा मुद्दा राजकीय नाही. संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीने घेण्याची मागणी होती. आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेने येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होतंय. या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती, त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पूजनाची पोटदुखी झाली होती. त्यांनाच आता “रामवर्गणी” डोळ्यात खूपत आहे. राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?” असं ट्विट करत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

………………….

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button