breaking-newsमुंबई

मुंबई सेंट्रल स्थानकात लोकलसमोर येत वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न, जवानांनी वाचवले प्राण

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातला एक व्हिडिओ समोर आला आहे. लोक ट्रेनची वाट पाहताना एक आजोबा शांतपणे उतरले. समोरून लोकल येत होतीच त्याचवेळी त्यांनी ट्रॅकवर बसून घेतले. फलाटावर उभ्या असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा सुरू केला. तोपर्यंत लोकल जवळ येण्यास सुरूवात झाली होती. आता या वृद्ध माणसाचं काय होणार हा प्रश्न पडलेला असतानाच धाडस करून MSF स्टाफ मनोज आणि अशोक यांनी रूळावर उडी मारत आजोबांना बाजूला केलं. आजोबांना बाजूला करताच काही क्षणात ट्रेन त्या रूळावरून निघून गेली. हा सगळा प्रकार पाहणाऱ्यांच्या अंगावर काही क्षणांसाठी काटाच आला होता. मात्र अवघ्या काही सेकंदात जवानांनी या आजोबांचे प्राण वाचवले. वेस्टर्न रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

Western Railway

@WesternRly

Prompt & daring action by MSF staff Sh Manoj & Ashok, deployed with RPF saved life of a sr citizen who attempted suicide at Mumbai Central Station. His family expressed deep gratitude to them. @drmbct
@rpfwrbct
@RailMinIndia
@PiyushGoyalOffc
@PiyushGoyal#SaturdayMotivatio

या आजोबांना वाचवण्यात आलं असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच त्यांचे प्राण वाचवणाऱ्या मनोज आणि अशोक या दोघांचंही लोकांनी कौतुक केलं आहे. नेमक्या कोणत्या नैराश्याच्या गर्तेत जात या आजोबांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता ते समजू शकलेले नाही. मात्र अवघ्या काही सेकंदात त्यांचे प्राण वाचवण्यात जवानांना यश आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button