breaking-newsमुंबई

मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत एकाच वेळी तब्बल 55 कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबईला जेरीस आणल्याचं दिसत आहे. आता नव्याने मुंबई सेंट्रल येथे कोरोनाची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत एकाच वेळी तब्बल 55 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही संपूर्ण सोसायटी सील करण्यात आली . हा संसर्ग सोसायटीली अनेक लोकांपर्यंत पोहचला असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाने नवजीवन सोसायटीतील अनेकांचे स्वॅब नमुने घेतले असून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणीचे अहवाल आल्यानंतरच नेमका किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे कळणार आहे. प्रशासनाने पूर्ण सोसायटी सील केली आहे. तसेच अनेकांना त्यांच्या घरातच होम क्वारंटाईन केलंय.

मुंबई सेंट्रलची नवजीवन सोसायटी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. मागील दिड महिन्यात येथे 55 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण इमारतच सील करण्यात आली. मुंबईमधील कोरोना विषाणूने पुन्हा इमारतींमध्ये प्रवेश केला आहे. तीन पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेल्या इमारती पूर्ण सिल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात डी विभागातील मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीपासून झाली.

या इमारतीत गेल्या दिड महिन्यात 55 रुग्ण आढळून आले आहेत. याच इमारतीत नव्याने पुन्हा 5 रुग्ण आढळून आल्याने ही इमारत सील करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत सध्या अंधेरी ते दहिसर, भांडूप, मुलुंड, ग्रॅंटरोड या विभागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईतील हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. या विभागात विशेष करुन इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार सर्वाधिक झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button