breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळणार १५ हजार ५०० रुपये बोनस

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर झाला आहे. कोरोनाकाळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनन्यसाधारण कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांचा यंदा बोनस मिळावा अशी मागणी होत होती.

महापालिका कर्मचाऱ्यांना १५,५०० रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ७,७५० रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक ४७०० रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक २३५० रुपये, सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून ४४०० रुपये देण्यात येणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाकाळात प्राणाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. बोनसमुळे पालिकेच्या तिजोरीवर १५५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. कोरोनामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटले असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र बोनस देण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button