मुंबई पोलिसांना बदनाम करण्यास सोशल मीडियावर ८० हजार फेक अकाऊंट
![Will the secret of Sushant's suicide be revealed? 'Justice' movie trailer released](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/399964-866718-sushant-pti1.jpg)
मुंबई – सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं गूढ आता एम्स रिपोर्टसोबत समोर आलं आहे. फॉरेन्सिक तपासात एम्सच्या ७ सदस्यांच्या पॅनलने सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, सुशांतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच आहे.
मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी ८० हजार फेक अकाऊंट ओपन करण्यात आले. याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटने या फेक अकाऊंटची यादी तयार केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे फेक अकाऊंट भारतातील नसून हे इटली, थायलँड, फ्रान्स, इंडोनेशिया, टर्की सारख्या देशातून ऑपरेट केले जात होते.
तसेच काही अकाऊंट तर असे आहेत जे २०१० मध्ये तयार केले आहेत. मात्र त्यांना आता ऍक्टिव दाखवण्यात येत आहे. या सर्व अकाऊंटच्या माध्यमातून #justiceforSushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले.
मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला. आता IT ऍक्टनुसार सायबर सेल फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आता सायबर सेलने २ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अनेक सोशल मीडियावरील ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमांचा समावेश आहे. परमबीर सिंह यांनी यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात IT ऍक्ट अंतर्गत ६७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.