breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत

  • अ‍ॅक्सिस बँकेतील करार संपुष्टात

मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत. तसेच बँकेतून पोलिसांना 1 कोटी विमा कवच आणि इतर सुविधा देखील मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. त्यानंतर राज्य सरकारने एचडीएफसी बँकेत पगार करण्याचा निर्णय घेतला.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने 2015 साली सरकारने पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता. या पार्श्वभुमीवर अ‍ॅक्सिस बँकेंसोबतचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलिसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

पोलिसांना मिळणार ‘या’ सुविधा
नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक देणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button