breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई-पुणे हायपर-लूप प्रकल्प: रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाईन्यूज | मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ब्रिटनमधील ‘व्हर्जिन’ उद्योग समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी गुरूवारी सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीत पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित हायपर-लूप प्रवासी वाहतुकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पासंदर्भात तसेच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडीत चर्चा करण्यात आली. ब्रॅन्सन यांनी त्यांच्या समूहाच्या विविध प्रकल्पांबाबत यावेळी मुख्यमंत्र्याना माहिती दिली आहे.

रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या उद्योग समूहाला महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आमदार आदित्य ठाकरे ही उपस्थित होते. मुंबई-पुणे हायपरलूपला जुलै २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून आधीच्या सरकारने मान्यता दिली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रकल्पाचा फेरविचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. तसंच हा प्रकल्पही स्थगित होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. याच पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button