breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत N 95 चे बनावट मास्क विकणाऱ्या आरोपीला अटक

कोरोना संकटाच्या काळात अनेक दुकानदारांपासून ते हॉस्पिटलपर्यंत अनेकजण गैरमार्गानं खिसे भरले जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.यातलीच एक घटना म्हणजे मुंबईत एन ९५ मास्कच्या नावान अनेक बनावट मास्क विकले जात आहेत. अशाच एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोनापासून खबरदारीचे उपाय म्हणून नागरिक सॅनिटायझर, मास्कची खरेदी करतात. पण या संकटातही सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. क्राइम ब्रँचच्या युनिट ३ च्या पथकानं बनावट एन ९५ मास्क (N 95 Mask) विकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपये किंमतीचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.

सफदर हुसैन मोमिन असं या आरोपीचं नाव आहे. डीसीपी अकबर पठाण आणि निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडील जवळपास २१ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे बनावट मास्क जप्त केले आहेत.

व्हिनस कंपनीच्या नावाखाली हे मास्क तयार करून विकले जात होते. याबाबत कंपनीला माहिती मिळाली असता, त्यांनी पोलिसांत कळवले. त्यानंतर पोलिसांनी गोदामावर छापेमारी केली. या कंपनीचे एन ९५ मास्क हे देशभरातील अनेक रुग्णालये आणि अन्य ठिकाणी डॉक्टरांकडून वापरले जात आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे मास्क खूपच सुरक्षित असल्याचे मानले जाते. पोलिसांनी जप्त केलेले एन ९५ मास्क हे बनावट आहेत, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

तसेच मास्क घेतानाही नीट काळजीपुर्वक तपासून घेतले पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button