मुंबईत तीन तर पुण्यात एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/police-and-corona-2-1.jpg)
मुंबई : मुंबईत दिवसभरात (15 जून) तीन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पुणे पोलीस दलातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी आणि निर्मल नगर पोलीस ठण्यातील कर्मचारी कोरोनाबळी ठरले आहेत.
पुण्यात आतापर्यंत पोलीस दलातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान पवार यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ते पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत होते.
भगवान पवार हे आजार पणाच्या रजेवर होते. यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनासह त्यांना इतर ही व्याधी होत्या. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सहाय्यक फौजदारासह वाहतूक शाखेतील पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे .
आतापर्यंत तब्बल 76 अधिकाऱ्यांसह पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 25 पोलीस रुग्णालयात उपचार घेत असून 48 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्यांमध्ये एका एसीपीचा समावेश आहे.