breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत कॉल सेंटर, विवाह आणि मासेमारीला सशर्त परवानगी
![# Covid-19: Response to Standing Committee on Vaccination](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/bmc.jpg)
मुंबई | मुंबईचं अर्थचक्र सुरू राहावं म्हणून मुंबई महापालिकेने कंटेन्मेंट झोन वगळून इतर भागात अत्यावश्यक सेवेतील काही गोष्टींना आजपासून मर्यादितप्रमाणात लॉकडाऊनमधून सशर्त परवानगी दिली आहे. यानुसार ज्या संस्था किंवा व्यवसाय इत्यादींना सूट देण्यात येईल त्यांनी किमान मनुष्यबळाचा वापर करून सदर कार्यवाही करणे अपेक्षित आहे, असं पालिकेनं म्हटलं आहे.
पालिकेने कंटेन्मेंट झोन नसलेल्या परिसरातच मासेमारी, कॉल सेंटरसह विवाह समारंभांनाही काही अटींवर सूट दिली आहे. मात्र, या अटींचा भंग केल्यास संबंधितांना एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही पालिकेने दिला आहे.