breaking-newsमुंबई

मुंबईत आता इमारतींमध्ये ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

मुंबई : मुंबईतील ‘कोरोना’ रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. सुरुवातीला मुंबईच्या झोपडपट्टी भागात कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात सापडत होते, पण आता हा ट्रेंड बदलला आहे. मुंबईतील अनेक इमारती आणि संकुलांमध्ये कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढीचा ट्रेंड बदलत आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, मुलुंड, कांदिवली, बोरिवली भागात 15 दिवसांपूर्वी झोपडपट्टी भागातून अधिक संख्येने कोरोनाचे रुग्ण मिळत होते, परंतु गेल्या 15 दिवसांपासून इमारतींमधून निम्म्याहून अधिक रुग्ण सापडत आहेत.

हा बदलता कल लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आता इमारतींमध्ये स्क्रिनिंग सुरु केलं आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर हा ट्रेंड बदलल्याचे पालिकेचे मत आहे. मुंबईत रुग्णवाढीचा पॅटर्न झोपडपट्टींकडून इमारतींकडे वळला आहे.

लॉकडाऊन असेपर्यंत पालिकेच्या डी विभागातील मलबार हिल परिसरात कोरोना नियंत्रणात होता. कोरोना संकटाच्या अगदी सुरुवातीच्या काळात इथे रुग्ण वाढले होते. परंतु मध्यंतरी रुग्णांची वाढ अत्यल्प होती. म्हणजे दिवसाला 5-7 रुग्ण आढळायचे. परंतु आता सुमारे 25 ते 30 रुग्ण सापडतात. त्यामुळे इथल्या हायराईज बिल्डिंगना कोरोना संकटाने घेरल्याचं चित्र आहे.

आठवडाभरात 21 कोरोना रुग्ण मिळाल्याने मलबार हिलच्या नेपियन्सी रोडवरील ‘तहनी हाईट्स’ ही 34 मजली बिल्डिंग मुंबई महापालिकेने सील केली. विशेष म्हणजे 21 रुग्णांपैकी 19 जण हे घरकाम करणारे, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या इमारतीतील इतर 20 कामगार, सुरक्षा रक्षकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

घरकामासाठी येणारे कामगार, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक यांना मास्क, सॅनिटाईझर देणं तसंच सोशल डिस्टन्सिंगसह इतर खबरदारी बाळगण्याच्या सूचना संबंधित घर मालकांनी द्यायला हव्यात, असं पालिकेने या गगनचुंबी बिल्डींगच्या रहिवाशांना कळवलं आहे. तर दुसरीकडे उपनगरातसुद्धा मुलुंड, कांदिवली, बोरिवलीमध्ये सुद्धा मोठमोठ्या संकुलात आता कोरोना रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे.

मुंबईत नव्याने निर्माण झालेल्या कोरोनाच्या रेडझोनमध्ये मुंबई महापालिका मिशन झिरो मोहिम राबवणार आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरातील बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली, भांडूप, मुलुंड या भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने नवा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button