breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील तरुणीला ग्लोबल सिटिझन पुरस्कारासाठी नामांकन

मुंबई – मुंबईतील सुहाना जलोटा या तरुणीला ‘ग्लोबल सिटिझन पुरस्कार : सिस्को युथ लीडरशिप अवार्ड’साठी नामांकन प्राप्त झाले आहे. झोपडपट्टी भागांतील महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करण्याबरोबरच, त्याबाबतच्या उत्पादनांत या महिलांना सहभागी करून घेत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देत असल्याने या २६ वर्षीय तरुणीला नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या आणि अंतिम तीन जणांमध्ये स्थान मिळवलेल्या सुहानी जलोटा या एकमेव भारतीय आहेत.

सुहानी जलोटा यांनी २०१५ मध्ये ‘मायना महिला फाऊंडेशन’ची स्थापना केली. या समाजसेवी संस्थेमार्फत जलोटा यांनी मुंबईच्या झोपडपट्टीतील महिलांना मासिक पाळीबाबतच्या आरोग्याबाबत जागरूक केले. तसेच मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्याबाबत गोवंडीतील नटवर पारेख कंपाऊंडमधील ११०० महिलांचे सर्वेक्षण करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना सॅनिटरी पॅड मिळतील अशी व्यवस्था उभी केली. २०२५ पर्यंत २० लाख महिलांना मासिक पाळीशी संबंधित साधने व सेवा पुरवण्याचा मायना महिला फाऊंडेशनचा मानस आहे.

सुहानी जलोटा या सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आरोग्य धोरण व त्याचे अर्थशास्त्र या विषयावर पीएच. डीसाठी संशोधन करत आहेत.

पुरस्काराचे स्वरूप

  • ‘ग्लोबल सिटीझन पुरस्कार : सिस्को युथ लिडरशीप अवार्ड’ हा पुरस्कार गरीबांसाठी काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना दिला जातो. नामांकन मिळाल्यानंतर आता मतदानाच्या माध्यमातून विजेत्याची निवड होईल.
  • विजेत्या कार्यकर्त्यांच्या संस्थेला २.५० लाख डॉलर इतका भरीव निधी समाजकार्यासाठी दिला जातो.
  • जलोटा यांच्यासह रवांडातील पाणीप्रश्नावर काम करणाऱ्या ख्रिस्टेल क्वाझिरा आणि फिलिपाइन्समधील दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या रॅन गर्सोवा यांना अंतिम तीन जणांत नामांकन मिळाले आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button