breaking-newsमुंबई

मुंबईतील ओशिवरा येथील इमारतीमध्ये आग

मुंबईत आगीचे सत्र सुरूच असून शुक्रवारी रात्री ओशिवरा येथील मेगामॉलजवळील स्वाती सोसायटीत आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे तीन बंब आणि पाण्याचे तीन टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत.

मेगामॉलजवळ स्वाती सोसायटी असून याच सोसायटीत सलमान खानचा सुरक्षा रक्षक शेराचे कार्यालय आहे. या सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

एम्बेड केलेला व्हिडिओ

या सोसायटीला ओसी मिळालेली नाही, असा दावाही केला जात आहे. या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामही झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारी यंत्रणांकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button