breaking-newsTOP Newsमुंबई

मुंबईच्या महापौरांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन

मुंबई – कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत असताना आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. सुनील कदम असे त्यांचे नाव होते. त्यांच्या आठवणीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक कविताही पोस्ट केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर याही होम क्वारंटाइन झाल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर या १४ दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच सुनील कदम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मागील सात दिवसांपासून नायर रुग्णालयात सुनील कदम यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर शनिवारी सकाळी सुनील कदम यांची प्राणज्योत मालवली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button