breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
मानखुर्दमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 14-15 गाड्या घटनास्थळी दाखल
![Chemical company catches fire in Mankhurd, 14-15 vehicles of fire brigade arrive at the spot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Fire-flames-burning-acciden.jpg)
मुंबई – मुंबईत आगीचे सत्र सुरू असून आता मंखुर्दमध्ये भीषण आग लागली आहे. मांडला परिसरातील केमिकल कंपनीला आग लागली असून धुराचे मोठे लोळ हवेत पसरताना दिसत आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीचं अत्यंत रौद्र रुप दिसत आहे. आगीला विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 ते 15 गाड्या दाखल झाल्या आहेत.
जिथे आग लागलीय त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटलं जातं. ही आग वाढत चालली आहे. आगीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत. आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूचा परिसर खाली करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत.