Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
“माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय” – यशोमती ठाकूर
हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झाल्याचे भावनिक ट्विट करत या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
त्या म्हणाल्या, “माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया.”