माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, शुभेच्छा देणाऱ्यांचा मनापासून आभारी : निलेश राणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/nilesh-rane.jpg)
मुंबई | माजी खासदार निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो”, असं निलेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत.
निलेश राणे यांनी 16 ऑगस्ट रोजी ट्विटरवर आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून ते मुंबईत सेल्फ क्वारंटान होते. यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती. “कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं.