breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मागासवर्गीयांच्या हितासाठी काँग्रेस कोणतीही लढाई लढण्यास तयार

मुंबई |महाईन्यूज

दलित, आदिवासी, मागासवर्गींयांना विरोध, हा भाजपच्या रक्तात असून त्याच मानसिकतेतून आरक्षण संपुष्टात आणण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. परंतु काँग्रेस पक्ष मागासर्गीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कोणताही संघर्ष करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा काँग्रेस सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी दिलेला आहे.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, केंद्रातील व उत्तराखंडमधील भाजप सरकारने संविधान आणि अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या मूलभूत अधिकारावरच हल्ला चढवलेला आहे. अनुसू्चित जाती-जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही. तसेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची नाही असा दावा उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीवेळी केला असा आरोप खरगे यांनी केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button