breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महिलेला समोर ठेवून कधी राजकारण केलं नाही, राष्ट्रवादीत प्रवेश होताच खडसेंचा फडणवीसांना टोला

मुंबई – गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश केला. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची सुकन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहेे. या प्रवेशासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अजित पवार या सोहळ्याला उपस्थित नाहीत.

राष्ट्रवादीत प्रवेश होताच त्यांनी भाजपविरोधातील खदखद व्यासपीठावर बोलून दाखवली. मी कधीही कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. मात्र माझ्यावर अत्यंत वाईट आरोप लावण्यात आले. वियनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यामागे ईडी लावली. मात्र महिलेला समोर ठेवून मी कधी राजकारण केलं नाही, असं खडसे म्हणाले. तसेच, त्यांनी शरद पवार यांचे राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल आभार मानले.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी गुरुवारीच विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.

एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ‘मी भाजपाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपाचं काम केलं. भाजपा जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवला’, असे एकनाथ खडसे म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ खडसे

  • कुणी किती भूखंड खालले हे आता दाखवून देईन
  • नाथाभाऊची ताकद जळगावमध्ये दाखवेन
  • पवारांचं मार्गदर्शन लाभणं भाग्याचं
  • महिलेला समोर ठेवून कधी राजकारण केलं नाही
  • पक्षश्रेष्ठींनी मला भाजपमध्ये भविष्य नसल्याचं सांगितलं.
  • दुप्पट वेगाने मी राष्ट्रवादी वाढवेन
  • मनापासून काम करेन असा शब्द देतो, फक्त पाठीशी उभे राहा
  • माझ्या आरोपांवर भाजपने अद्यापही उत्तर दिलेली नाहीत
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button