महाविकास आघाडी खातेवाटप: आमच्यामध्ये थोडीशी नव्हे; तसूभरही चर्चा नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
![Mahavikas Aghadi Cabinet Accounts: Not a Few of Us; No discussion at all: Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Ajit-pawar-1.jpg)
खातेवाटप प्रश्नावर अजित पवार यांचा मिडियाला टोला…
मुंबई: आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत ते मला कळू शकणार नाही असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार होता त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला असता या बातम्या मिडियातील आहेत असेही स्पष्ट केले.
खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. तिन्ही नेते यासंदर्भाचा निर्णय घेतील. आणि हा निर्णय तिन्ही पक्षाला मान्य असेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यस्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, भुजबळसाहेब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत अशी बातमी नाही असेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.