breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 37 वर, पुण्यात सर्वाधिक 16 रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-213.png)
भारतातही कोरोना विषाणूची दहशत पसरली आहे…मात्र महाराष्ट्रातही कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. एवढच नाही तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंबईमध्ये आणखी तीन कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 37 वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ही माहिती दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-20.jpg)
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 37 झाली आहे. पुणे 16,मुंबई 8,ठाणे 1,कल्याण 1,नवी मुंबई 2,पनवेल 1,नागपूर 4,अहमदनगर 1 ,यवतमाळ 2,औरंगाबाद 1, पुण्यात सर्वाधिक १६ रुग्ण आहेत. …मात्र नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे…