महाराष्ट्राचे कारभारी लयभारी! आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/Ashish-Shelar-And-CM-Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई – पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सेलिब्रेटी देखील शेतकऱ्यांच्या समर्थनात उतरले. अनेक सेलिब्रेटींसह खेळाडूंनी देखील सरकारला पाठिंबा दर्शवणारे ट्विट केले होते. आता या ट्विटची चौकशी करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.
भाजपआमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले.
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..
आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार
आणि
भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?
वा रे वा!
महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर.. आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!, असा जोरदार टोला शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
महाविकास आघाडीचे डोके ठिकाणावर आहे का ? असा संतप्त सवाल देखील आशिष शेलारांनी केला.