breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची दिली धमकी
![To whom was the contract awarded? The question of netizens; ‘To your father’, the mayor replied](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/kishori-pednekar.jpg)
मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली होती. २२ डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती.
३१ डिसेंबरला आजाद मैदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक. २६१/२०२० अंतर्गत जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किशोरी पेडणेकर सातत्यानं भाजपवरही हल्लाबोल करत होत्या. आता याचा शोध पोलिस कसा घेतात आणि नेमकी कारण काय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.