Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका – राज ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/raj_2_1579763304_618x347.jpeg)
मुंबई |महाईन्यूज|
जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिवशी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधले होते. यावरुन राजकारण चांगलेच तापले. मात्र, आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले आहे. मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका अशा सूचनाच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिका-यांना दिल्या आहेत.
मनसेच्या मुंबईतील महाअधिवेशनानंतर 9 फेब्रुवारी रोजी CAAच्या समर्थनार्थ मनसेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रंगशारदा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र, फक्त दहा मिनीटांत राज ठाकरे बैठकीतून बाहेर पडले.