breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर घ्यावे, विनायक मेटेंची मागणी

मुंबई । प्रतिनिधी

आज होणाऱ्या सुनावणीत मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर घ्यावे ही महाराष्ट्र शासन, शिवसंग्रामसह इतर याचिकाकर्त्यांची मागणी असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे म्हटले आहे.

आज न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांचे वकील आज बाजू मांडणार आहेत. आज मुकूल रोहोतगी, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडतील. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सुनावणी संपणार आहे. त्यानंतर अंतरिम आदेशासाठी तारीख निश्चीत केली जाण्याची शक्यता आहे.

याबाबत विनायक मेटेंनी फेसबुक पोस्ट म्हटले की, आज होणाऱ्या सुनावणीत मराठा आरक्षण प्रकरण अकरा न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर घ्यावे ही महाराष्ट्र शासन, शिवसंग्रामसह इतर याचिकाकर्त्यांची मागणी आहे. ईडब्ल्यूएस प्रकरणाप्रमाणे हे ही प्रकरण घटनापीठाकडे वर्ग होईल असा आम्हाला विश्वास आहे. आज गणपती बाप्पा जाता जाता आपल्याला आशिर्वाद देवुन जातील आणि मराठा आरक्षण अबाधित राहील अशी आशा व्यक्त करुयात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button