breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मंत्रालयाच्या दालनावर झळकली ‘मुख्‍यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी पाटी

मुंबई ।महाईन्यूज|

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज दुपारी एक वाजता पदभार स्‍वीकरणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनावरील पाटी बदलण्यात आली आहे. ‘मुख्‍यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा नावाची पाटी आता झळकली आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनावरील ‘पाटी विविध फुलांनी सजवण्‍यात आली आहे.

‘मुख्‍यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी मराठीत पाटी मुख्यमंत्री दालनावर लावण्‍यात आली आहे. ही मराठीतील पाटी लक्षवेधक ठरत आहे. त्‍यातच या पाटीभोवती विविध रंगबेरंगी फुलांची आरास केली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड संवर्धन आणि परिसर विकासासाठी २० कोटी रुपये निधी वितरित करण्याचा पहिला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button