breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मंकी हिल ते कर्जत दरम्यान ‘अप’ मार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी पुणे-मुंबई रेल्वेगाड्या रद्द…

मुंबई | महाईन्यूज |

मंकी हिल ते कर्जत दरम्यान ‘अप’ मार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी येत्या आठवड्यात ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २१ ते ३१ जानेवारी या दरम्यानच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मंकी हिल ते कर्जत मार्गावरील बोर घाटात सुरू असणारे देखभाल-दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची मुदत ३० जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे.

या गाड्यांमध्ये पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर ३० जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर २३, २५ आणि ३० जानेवारीदरम्यान, पंढरपूर-सीएसएमटी पॅसेंजर २४,२६ आणि ३१ जानेवारीदरम्यान रद्द केली आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस ३० जानेवारीपर्यंत मनमाड-दौंडमार्गे धावेल. सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्‍स्प्रेस ३० जानेवारीपर्यंत कोल्हापूर ते पुणे अशी धावणार आहे . मुंबई-बीजापूर एक्‍स्प्रेस २१, २२ आणि २६ ते २९ जानेवारीला रद्द आहे. तर, बीजापूर-सीएसएमटी एक्‍स्प्रेस २० ते २३ आणि २७ ते ३० जानेवारी रद्द आहे. दौंड-साईनगर शिर्डी-दौंड पॅसेंजर २१ ते ३० जानेवारीदरम्यान रद्द करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button