breaking-newsमुंबई

भारतातील शेअर बाजार कोसळला

मुंबई – आज सोमवारी भारतातील शेअर बाजार कोसळला आहे. शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 129 अंकांनी घसरून 37,606 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 28 अंकांनी घसरून 11,073 अंकांवर बंद झाला होता. आज सुरुवातीलाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि निफ्टी हे अनुक्रमे 11 आणि 15 अंकांनी घसरले. त्याचा फटका रिलायन्सच्या शेअर्सना बसला. रिलायन्सच्या शेअर्सचा भाव खाली आला. बाबा रामदेव यांच्या ‘रूची सोया’च्या शेअरचे भावदेखील 5 टक्क्यांनी घसरले.

आज सोमवारी शेअर बाजार व्यवहाराच्या सुरुवातीलाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 11.16 व निफ्टी 15.9 अंकांनी घसरला. आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये सुरुवातीलाच 3 टक्क्यांनी घसरण झाली. तर बाबा रामदेव यांच्या रुची सोयाचे शेअर्स सुरुवातीलाच 5 टक्क्यांनी घसरले. शुक्रवारी भारताच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली मात्र दुसरीकडे अमेरिकेचा शेअर बाजार वधारला आहे. अमेरिकेच्या डाऊ जोन्समध्ये 0.44 टक्क्यांनी वाढ होऊन 114.67 अंकांनी वाढ होऊन बाजार 26,428.30 अंकांवर शुक्रवारी बंद झाला होता. तर अमेरिकेच्या दुसऱ्या नॅसडॅक बाजारात 1.49 टक्क्यांची वाढ होऊन बाजार 157.46 अंकांच्यावर गेला व 10,745.30 अंकांवर बंद झाला होता. तर एसएंडपी 0.77 टक्क्यांनी वाढून 24.90 अंकांच्यावर जाऊन 3,271.12 अंकांवर बंद झाला होता. तसेच शुक्रवारी चीनच्या शांघाय कंपोझिट बाजार 0.70 अंकांनी वाढून 3,333.26 वर बंद झाला होता. मात्र इटली, जर्मनी आणि फ्रान्सच्या शेअर बाजारात घसरण झालेली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button