breaking-newsमुंबई

‘बिग बॉस १३’चा स्पर्धक असिम रियाजवर हल्ला

मुंबई – ‘बिग बॉस १३’ या रिऍलिटी शोमध्ये सर्वांत चर्चेत राहिलेला स्पर्धक असिम रियाज याच्यावर बुधवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात असिम हा जखमी झालाआहे. घराबाहेर सायकल चालवण्यासाठी निघालेल्या असिमवर हा हल्ला झाला. असिमचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये असिम सांगताना दिसत आहे की, जेव्हा बुधवारी रात्री १० वाजता तो सायकल चालवण्यासाठी निघाला, तेव्हा बाईकवरील अज्ञात लोकांनी त्याच्यावर मागून हल्ला केला. असिमच्या पायाला, हाताला व पाठीवर दुखापत झाली आहे. हल्ला करणाऱ्यांना तो ओळखत नसल्याचे असिमने सांगितले. या घटनेची तक्रार त्याने पोलिसांकडे दाखल केली की नाही याबाबत त्याने काहीच सांगितले नाही. असिमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते त्यावर भरभरून कमेंट्स करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button