breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई – भाजपविरोधातील नाराजी खुलेआम उघड करणारे एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यातच त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण भाजपमध्ये राहणार असून पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचं रक्षा खडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, बाबांचा (एकनाथ खडसे) निर्णय दु:खद आहे. मी भाजपकडून निवडून आलेली आहे. लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार. नाथाभाऊंनी देखील पक्षाचं योगदान मान्य केलंय. 40 वर्ष त्यांनी पक्ष वाढवला. मात्र आज त्यांनी व्यक्तिगत कारणांमुळं त्यांनी राजीनामा दिलाय, असं त्या म्हणाल्या.

राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button