breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह! बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन
![Balasaheb Thorat Congress oppose rename of Aurangabad to Sambhajinagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Balasaheb-Thorat.jpg)
मुंबई | राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर खबरदारी म्हणून बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. हे तिन्ही नेते कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत.