breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पोलादपूर अपघात : राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत जाहीर

मुंबई – महाबळेश्वरनजीक पोलादपूर येथे शनिवारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३२ जण ठार झाले आहेत. यांतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यात जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारांचा सर्व खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे.

रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस शनिवारी दरीत कोसळली. या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी सर्वप्रथम दिली. आता या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. या बसमध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे  कर्मचारी पिकनिकसाठी निघाले होते. बस सकाळी १०.३० च्या दरम्यान दरीत कोसळली अशी माहिती समोर आली. या अपघातात आत्तापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश सावंत हे या अपघातातून बचावले आहेत.

रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली. या बसमध्ये ड्रायव्हरसह ३४ जण होते. यांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दापोलीवर या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. यामधील बचावलेले एकमेव कर्मचाऱी प्रकाश सावंत यांनी बस कोसळत असताना बाहेर उडी घेतल्याने ते बचावले आहेत. यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठात कळवले.

या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला आहे. शनिवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान बस सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळली. हा घाट अत्यंत बिकट आहे. जिथे हा अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नाही, त्यामुळे नेमका अपघात कसा झाला ते समजू शकलेले नाही. बस जेव्हा कोसळली तेव्हा अनेकजण फेकले गेले आणि झाडांमध्ये अडकले असेही स्थानिकांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button