breaking-newsमुंबई

नालासोपारा स्फोटक प्रकरणातील सर्व आरोपींवर युएपीएअंतर्गत आरोपपत्र दाखल

नालासोपारा येथील घरामध्ये अवैध पद्धतीने शस्त्रात्रांचा साठा बाळगल्याप्रकरणी अटकेत असललेल्या वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर या तिघांवर आर्म अॅक्टनुसार, बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार (युएपीए) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ANI

@ANI

Nalasopara Arms Haul case: Chargesheet filed against all accused including Vaibhav Raut and others under relevant sections of Unlawful Activities (Prevention) Act, Indian Penal Code, Arms Act and Maharashtra Police Act.

नालासोपारा येथे १० ऑगस्ट रोजी एटीएसने छापेमारी केली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दडवून ठेवलेला अवैध शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला होता. याच्याशी संबंधीत वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक करण्यात आली होती. यातील सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान या संभाजी भिडे यांच्या संघटनेशी संबंधित असून वैभव राऊत हा सनातनशी संबंधीत आहे. तर शरद काळसकर नालासोपारा येथील रहिवासी असून सुधन्वा गोंधळेकर मूळचा सातारा येथील रहिवासी आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने शरद काळसकर, सुधन्वा गोंधळेकर या दोघांना वसईतून अटक केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button