Breaking-newsमुंबई
नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम स्थगित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Nana.jpg)
मुंबई – मुंबईचे शिल्पकार, द्रष्टे समाजसुधारक नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांची ३१ जुलै २०२० रोजी १५५वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद व ना. जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानच्या वतीने वडाळा येथील नाना शंकरशेट स्मारक स्थळ येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न होतो. तसेच मुंबई महानगरपालिका सभागृह, रेल्वे मुख्यालय, टाऊन हॉल, नाना शंकरशेट (सोनापूर) स्मशानभूमी, वडाळा येथील नाना शंकरशेट स्मारक स्थळ येथेही अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न होतो. मात्र यंदा कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊन व शासनाच्या निर्बंधांमुळे हे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिषद व प्रतिष्ठानचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व अॅड. मनमोहन चोणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.