breaking-newsमुंबई

धक्कादायक! ‘या’ कुख्यात गुंडाच्या आईला मोक्काअंतर्गत गुन्ह्यात अटक

मुंबई | महाईन्यूज

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, एजाज लकडावाला, रवी पुजारी या सर्वांना त्यांच्या गोरखधंद्यामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांची मुंबई गुन्हे शाखेने धरपकड सुरू केली आहे. त्यातच आता प्रसाद पुजारी याच्या आईविरोधात देखील मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विक्रोळी येथील व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी प्रसाद पुजारी आणि त्याच्या साथीदारांवर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कुख्यात गुंड प्रसाद पुजारीची आई इंदिरा विठ्ठल पुजारी (६२) हिच्यासह अन्य एकाला पोलिसांनीअटक केली आहे.

विक्रोळीतील शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गँगस्टर प्रसाद पुजारीच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होते. त्यानुसार, या प्रकरणी एकाला मध्य प्रदेश तर दुसऱ्याला ठाणे येथून विक्रोळी पोलिसांनी अटक केली. कृष्णधर सिंग आणि आनंद फडतरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विक्रोळीतील रहिवासी असलेले जाधव यांच्यावर १९ डिसेंबर रोजी मंदिराच्या आवारातच गोळीबार करण्यात आला होता. जाधव विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. विक्रोळीतील म्हाडा किंवा अन्य शासकीय, खासगी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, त्यातील विविध कंत्राटे, लोकप्रतिनिधींच्या निधीतून केल्या जाणाºया विविध योजना आदींची जबाबदारी जाधव पाहात होते. येथील संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रसाद पुजारी याने जाधव यांना अनेकदा धमकावले होते, अशी माहिती यापूर्वी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार, पोलीस या प्रकरणाची शहानिशा करत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button