“देवेंद्रजी, कामाला लागा! बहिष्काराने ‘संवाद’ कसा होईल?”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-175.png)
मुंबई |महाईन्यूज |
भाजपने सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं नसल्याचंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागावे असा सल्ला शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधून देण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. याचाच धागा पकडून अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बहिष्कार टाकण्यापेक्षा फडणवीस यांनी शेतकरी, कष्टकरी या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता, असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-50.png)
भाजपने सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या 105 आमदारांशी संवाद साधायचं ठरवलं तर विरोधी पक्षनेत्यांचं काय होईल असा खोचक सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.