दूर्गापूजा, दसरा साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![8 hours duty of women police; Big decision of the state government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/udhav.jpg)
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन केले आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलेय. गणपती उत्सवादरम्यान प्रशासनास ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते. त्याचप्रमाणे या नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी या सणांबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सर्व धर्माच्या नागरिकांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे केल्या बद्दल उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच अभिनंदन केले आहे.