दिशा पटानीसोबत आदित्य ठाकरेंचा डिनर? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/aditya-thackeray-5.jpg)
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलिशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी दिसत आहे. दिशा आणि आदित्य ठाकरे डिनरला गेले होते, अशी चर्चा आहे.
दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिशा तिचे फोटो शेअर करत असते. त्यावरुन तिच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. शिवाय, अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या कथित अफेअरबाबत सुद्धा चर्चा होत राहते. मात्र, आता दिशा पटानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरला गेल्याची दिसली. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं.
खरंतर दिशा पटानीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली. आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.