breaking-newsमुंबई
दादरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Fire-aag-2.jpg)
- पाच विद्यार्थी थोडक्यात बचावले; मोठी दुर्घटना टळली
मुंबई : शाळेतून विद्यार्थ्यांना घरी सोडणाऱ्या स्कूल व्हॅनने मंगळवारी दुपारी दादर परिसरात अचानक पेट घेतला. अवघ्या काही सेकंदांत व्हॅन जळून खाक झाली. आग लागली तेव्हा वरळीतल्या ग्रीन लॉन्स शाळेत पहिली, दुसरीत शिकणारे पाच विद्यार्थी होते. व्हॅनचालक आणि कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत क्षणात पाचही विद्यार्थ्यांना व्हॅनबाहेर काढले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर दादर पश्चिमेकडील एस. एल. मटकर मार्गावरील सुपाश्र्व इमारतीसमोर दुपारी दोनच्या सुमारास व्हॅन थांबली तेव्हा खालच्या बाजूने धूर येऊ लागला. तो पाहून वाहतूक पोलीस आणि व्हॅनचालकाने पुढील हालचाली केल्या. याबाबत दादर पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.