तीन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/molestation_201807112358.jpg)
मुंबई – अँटॉप हिल परिसरात तीन अल्पवयीन मुलांवर अनोळखी व्यक्तीकडून लैंगिक शोषण अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
वडाऴा येथील अँटॉप हिल परिसरात ही मुले रहात असून ही मुलं 10 ते 12 वयोगटातील आहेत. शाळेत शिक्षत असलेली मुले गुरूवारी घराजवळून काही अंतरावर खेळत होती. त्यावेळी एका गर्दुल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवत जवळील पडिक घरात नेवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. वेदना असह्य झालेला एक मुलगा घरी येऊन रडत बसला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्याजवळ विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकर उघडकीस आला. त्यानंतर मुलांच्या पालकांनी त्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.