Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
घाटकोपर बसस्फोटातील आरोपी 16 वर्षांनंतर जाळ्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/black-man-arrested-.jpg)
- इरफान कुरेशीला औरंगाबादमध्ये अटक
मुंबई – मुंबईच्या घाटकोपर परिसरात 16 वर्षांपूर्वी बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इरफान कुरेशी अखेर जाळ्यात आला. त्याला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबादमध्ये पकडले.
गुजरात एटीएसचे पथक रविवारी एका दुसऱ्या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी औरंगाबादला गेले होते. त्यावेळी कुरेशीची माहिती मिळाली. त्यानंतर त्या पथकाने कुरेशीला त्याच्या नातलगाच्या घरातून ताब्यात घेतले. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले.
रविवारी रात्री मुंबईत नेल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. घाटकोपर बस स्थानकाजवळ 2 डिसेंबर 2002 ला एका बेस्ट बसच्या सीटखाली ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले. त्या स्फोटानंतर कुरेशी फरार होता.