breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?

मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचार गांभीर्याने सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अर्थात त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते.

शिवसेनेने आदित्य यांच्यासाठी मुंबई उत्तर-मध्यची जागा मागितली तर त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लढावे, असे भाजपाकडून सुचविले जाऊ शकते. उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेनही. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वा माझे वडील उद्धव  ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही पण, त्यांनी कुटुंबातील इतरांवर ते मत कधीही लादलेले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. आदित्य यांनी आजवर कोणतीही राजकीय निवडणूक लढविली नसली तरी, मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी ते निवडून आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button