breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल सुरू होणार?
![Will the local start from the first week of January?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/विजय-वडेट्टीवार-local.jpg)
मुंबई – सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा केव्हा सुरू होणार याकडे प्रत्येक मुंबईकर लक्ष ठेवून राहिला आहे. त्यातच, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.
मार्च २०२० पासून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. लोकल ट्रेन अनलॉकमध्ये सुरु करण्यात आल्या. मात्र त्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच. त्यानंतर नवरात्रात महिलांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली. लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत होता. त्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.