चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Chembur.jpg)
मुंबई – चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडा घालणाऱ्या 33 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी आता ही कारवाई केली आहे. काल झालेल्या राड्यात पोलिसांची कारवाई राड्यात 7 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते. संतप्त जमावाने पोलिसांना घेराव घालत त्यांना जाब विचारलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं
काय आहे प्रकरण…
चेंबुरमध्ये संतप्त जमावानं काल राडा केला होता. आधी या जमावानं रास्ता रोको केला त्यानंतर पोलिसांना मारहाण केली. चेंबुरमधून एका मुलीचं अपहरण झालं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. मात्र पोलिस या प्रकरणाचा योग्य रित्या तपास करत नाहीत असा आरोप इथल्या लोकांनी केलाय. त्यामुळे जमावानं सायन-पनवेल महामार्ग रोखून धरला. यावेळी काही वाहनांची तोडफोडही कऱण्यात आली होती. जमावाला रोखण्यासाठी इथं काही पोलिस आले तेव्हा या पोलिसांनाही धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. एकंदरीतच याठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.