breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चित्रपट मार्गदर्शन कार्यशाळा चित्रपटसृष्टीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

मुंबई |महाईन्यूज | प्रतिनिधी

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत चित्रपटसृष्टीत प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ऑडीशन, मार्गदर्शन कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
ही कार्यशाळा विनामुल्य स्वरुपाची असेल. या कार्यशाळेसाठी चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, छायाचित्रकार, अभिनेते यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. चित्रपटसृष्टीत नव्याने प्रवेश करु इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून ऑडीशन कसे द्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन होणार आहे. यास्तव या कार्यशाळेत इच्छूकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री.बिभीषण चवरे, प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या 022-24308876 या क्रमांकावर संपर्क करावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button