चिंताजनक! नवी मुंबई मेट्रोला चीनचे डबे, प्रकल्प पूर्ण करण्याबाबत ‘सिडको’ला चिंता
![Biodigester technology to be introduced in Pune Metro Biodigester, Pune Metro and DRDO, Atul Gadgil, Dr. D. K. Dubey, Dr. Brijesh Dixit,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Navi-Mumbai-Metro.jpg)
नवी मुंबई : भारत-चीन तणाव वाढल्यानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट चायना’ मोहीम जोर धरु लागलेली आहे. मात्र नवी मुंबईत धावणाऱ्या मेट्रोला चीनमध्ये उत्पादित करण्यात आलेले 24 डबे लागणार आहेत. त्यामुळे भविष्यातील डब्यांचा कशाप्रकारे पुरवठा होणार, हा प्रश्न आता ‘सिडको’ला आहे.
नवी मुंबईत सिडकोकडून चार मार्गावर मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रोसाठी लागणारे पहिल्या टप्प्यातील 24 डबे मागील वर्षीच दाखल झाले आहेत. हे डबे लावून मेट्रोची पहिली यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली होती. मेट्रोच्या पुढील मार्गासाठी चीनी कंपनीकडून डबे घेतले जाणार असून त्याची मागणी नोंदवण्यात आलेली आहे.
सिडको मेट्रोचा प्रकल्प पूर्ण कसा करणार ?
केंद्र व राज्य सरकारने चीनी प्रकल्पांना स्थगिती देण्याचा अथवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोसाठी लागणारे भविष्यातील डबे कशा प्रकारे पुरवले जातील, हा प्रश्न सिडकोला पडलेला आहे.
बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील कामे पूर्ण झाली असून आता काही तांत्रिक कामे सुरु आहेत. या मार्गावरील सिग्नल यंत्रणा, कोचेस आणि रुळ टाकण्याची कामे टाटा, अनसोल्डो, आणि एका चीनी कंपन्यांना संयुक्तरीत्या देण्यात आली होती. या तीन कंपन्यांसाठी अॅनटॅक कंपनीच्या वतीने चीन उत्पादित 24 डबे मागवण्यात आलेले आहेत.